नीरा उजवा कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाला वेग आला असून, कालव्याची देखभाल व आवश्यक दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण केली जात आहेत. या कामामुळे सिंचन व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळण्याची अपेक्षा आहे.
कालव्याच्या दुरुस्तीमुळे पाण्याची गळती कमी होऊन उपलब्ध पाण्याचा अधिक प्रभावी वापर होण्यास मदत होईल. खरीप तसेच आगामी हंगामातील पिकांसाठी नियमित पाणीपुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीने हे काम महत्त्वाचे मानले जात आहे.
